पंढरपुरातील हॉस्पिटलवरचा ताण कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:10+5:302021-05-09T04:23:10+5:30
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत भक्त निवास उपलब्ध करून दिल्याने जनकल्याण हॉस्पिटलअंतर्गत जनकल्याण कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय ...
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत भक्त निवास उपलब्ध करून दिल्याने जनकल्याण हॉस्पिटलअंतर्गत जनकल्याण कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, जनकल्याण हॉस्पिटलचे मार्गदर्शक कल्याणराव काळे, ‘विठ्ठल’चे चेअरमन भगीरथ भालके, मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, डीव्हीपीचे अमर पाटील, प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, वसंतदादा मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शिंगारे, युवा गर्जनाचे समाधान काळे उपस्थित होते.
पंढरपूर शहरासाठी १०० व ग्रामीण भागासाठी १०० असे २०० बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. त्यामुळे रुग्णांची सोय होणार असल्याचे सांगून कल्याणराव काळे यांनी पंढरपूर तालुक्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व लस उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले.