मतदान होताच पंढरपूरमध्ये कडक संचारबंदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:02+5:302021-04-20T04:23:02+5:30
यामुळे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शनिवार व रविवारी आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन सुरू ...
यामुळे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शनिवार व रविवारी आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन सुरू होते. परंतु कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या, ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा लक्षात घेऊन राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. त्यामुळे शनिवारी व रविवारी शहरातील सर्व दुकाने बंद होती. मात्र सोमवारी दुकाने उघडावी की बंद ठेवावी याबाबत व्यापाऱ्यांमध्ये द्विधावस्था झाली. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. अनेकजण एकमेकांना दुकाने केव्हा उघडायची आहेत, अशी विचारणा करत होते. पोलिसांकडून सूचना मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी सोमवारी दिवसभर दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरात दिवसभर रस्ते मोकळे पडल्याचे दिसून आले.
---
विठ्ठल मंदिर परिसरात सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.