बार्शी तालुक्यात लवकरच कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:42+5:302021-04-20T04:23:42+5:30
आ. राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी निकम व सभापती अनिल डिसले येथील कोविड केअर सेंटरला भेट देण्यासाठी व कोरोना पार्श्वभूमीवर आढावा ...
आ. राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी निकम व सभापती अनिल डिसले येथील कोविड केअर सेंटरला भेट देण्यासाठी व कोरोना पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यासाठी आले होते, यावेळी ते बोलत होते. आ. राऊत यांनी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तो वाढू नये, यासाठी कमीत कमी दहा दिवसांचा बार्शी तालुक्यामध्ये लाॅकडाऊन करण्याची मागणी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे केली होती. यावर बोलताना प्रांताधिकारी निकम यांनी लवकरच बार्शी तालुक्यात कडक लॉकडाऊनचा आदेश काढला जाईल, असे सांगितले.
तत्पूर्वी येथील कोविड सेंटरमधील सोयीसुविधांची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे सांगण्यात आले. तसेच वैराग शहरामध्ये पोलीस, वैद्यकीय, ग्रामपंचायत व महसूल यांच्या सहकार्याने पाच दिवसांचा जनता कर्फ्यूही होणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, संतोष निंबाळकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, जि. प. सदस्य मदन दराडे, पोलीस निरीक्षक विनय बहिर, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे, येथील वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड, तलाठी सतीश पाटील, वैजिनाथ आदमाने, नाना धायगुडे, डॉ. सुहास मोटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. संताजी देशमुख डॉ. आनंद गोवर्धन, डॉ. सचिन पाटील, डॉ. पवन गुंड, डॉ. रियाज तांबोळी, डॉ. श्रेयस शिंदे आदी उपस्थित होते.
----फोटो १९वैराग