कडक निर्बंध..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:30+5:302021-05-26T04:23:30+5:30
कडक निर्बंध तरी हॉटेल चालू आत जेवणाची पंगत सुरु बार्शी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हधिकाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवण्याचे ...
कडक निर्बंध तरी हॉटेल चालू आत जेवणाची पंगत सुरु
बार्शी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हधिकाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश लागू केला ओह. असे असतानाही बार्शी बायपासवर शंकरगड हॉटेल सुरू ठेवले. आत जेवणावळीची पंगत पोलिसांना दिसून आली. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी हाॅटेलमालकाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
सोमवारी (२४ मे) पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना बार्शी-लातूर बायपासवरील शंकरगड हॉटेल सुरू असल्याचे दिसले. तपासणी करताना बऱ्याच व्यक्ती जेवण करत होत्या. त्याबाबत मालकाचे नाव विचारले असता शंकर देवकर असल्याचे सांगितले.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस नाईक गणेश वाघमोडे यांनी शहर पोलिसांत तक्रार देताच शंकर देवकर (५१, रा. चोरमुले प्लॉट, बार्शी) यांच्याविरुद्ध भादंवि १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब नुसार गुन्हा दाखल केला आहे.
---