खासगीकरणाविरोधात करमाळ्यातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:09+5:302021-03-16T04:23:09+5:30
हा संप प्रामुख्याने सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची जी घोषणा केली, त्याच्या विरोधात आहे. या संपात ...
हा संप प्रामुख्याने सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची जी घोषणा केली, त्याच्या विरोधात आहे. या संपात राज्यातील दहा हजारांपेक्षा जास्त शाखेतून काम करणारे ५० हजार बँक कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आहेत. मंगळवारी रात्री बारापर्यंत बँकांचे कामकाज बंद राहील. या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होते, त्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे, असा विश्वास युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केला आहे.
या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्पलॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी झाल्या आहेत.
फोटो
१५करमाळा-बँक संप
ओळी : करमाळ्यात बँक कर्मचारी हातात फलक घेत संपात सहभागी झाले आहेत.