सोलापुरातील तहसिलदार, नायब तहसिलदारांचे कामबंद आंदोलन

By Appasaheb.patil | Published: April 3, 2023 03:41 PM2023-04-03T15:41:04+5:302023-04-03T15:41:48+5:30

सोलापूर जिल्ह्यातील नायब तहसिलदार व तहसिलदार हे सोमवार ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

strike of tehsildar and naib tehsildar in solapur | सोलापुरातील तहसिलदार, नायब तहसिलदारांचे कामबंद आंदोलन

सोलापुरातील तहसिलदार, नायब तहसिलदारांचे कामबंद आंदोलन

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग -२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन १९९८ पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नायब तहसिलदार व तहसिलदार हे सोमवार ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

संघटनेनी नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पे ४८००/-रु करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी यासंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही. तत्कालीन मा अपर मुख्य सचिव व मा. महसूल मंत्री व मा वित्तमंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तथापी त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने तसेच मा. श्री. के. पी. बक्षी यांचे अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे ४८००/- वाढविण्याबाबत सादरीकरण करुनही त्याचाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे नाईलास्तव नायब तहसिलदार व तहसिलदारांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यास सुरूवातही करण्यात आली. 

यापूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनावर एक नजर....

- ३ मार्च २०२३ - सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास आंदोलन करून निवेदन दिले.

- १३ मार्च २०२३ - एक दिवसीय रजा घेवुन सकाळी ११.०० ते १.०० वाजेपर्यंत सर्व विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन केले. त्यानंतर सर्व विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले.

- ३ एप्रिल २०२३ - राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: strike of tehsildar and naib tehsildar in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप