आजी-माजी आमदारांकडून जोरदार फिल्डिंग; मतदान अधिकाराचा ठराव करुन घेण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:58+5:302021-08-24T04:26:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अक्कलकोट तालुक्यातील विविध सहकारी संस्थांकडून मतदानाचे अधिकार प्राप्त करून ...

Strong fielding from former MLAs; Struggling to get the right to vote resolved | आजी-माजी आमदारांकडून जोरदार फिल्डिंग; मतदान अधिकाराचा ठराव करुन घेण्यासाठी धडपड

आजी-माजी आमदारांकडून जोरदार फिल्डिंग; मतदान अधिकाराचा ठराव करुन घेण्यासाठी धडपड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अक्कलकोट : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अक्कलकोट तालुक्यातील विविध सहकारी संस्थांकडून मतदानाचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी ठराव करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याकडून फिल्डिंग लावली जात आहे.

तालुक्यात शंभराहून अधिक संस्था असल्यातरी सर्वस्वी भिस्त विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मतदारावर असणार आहेत. अनेक वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होण्यासाठी तालुक्यात सतत सिद्रामप्पा पाटील विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळायचा. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळींनी एकत्रित येऊन त्यावर पडदा पाडला होता. या निमित्ताने म्हेत्रे यांना बँकेच्या संचालक मंडळात एंट्री करण्याची संधी मिळाली होती. त्या निमित्ताने पाटील व म्हेत्रे यांच्या राजकीय संघर्षालासुद्धा पूर्णविराम मिळाला होता.

यानिमित्ताने अक्कलकोट तालुक्याला प्रथमच दोन संचालक लाभले होते. आता गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय उलथापालथ झाल्या आहेत. सध्या विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी, सिद्रामप्पा पाटील एकत्र आहेत. विरोधात म्हेत्रे बरोबर पाटील, कल्याणशेट्टी विरोधातील असंतुष्ट गट बँकेच्या निवडणुकीत सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतीच पुणे येथे डी. डी.आर. व सहायक निबंधक व यांचे विभागीय सहनिबंधकांनी बैठक घेतली. त्यामध्ये बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १७ ऑगस्टपासून विविध प्रकारचे सहकारी संस्थांच्या मतदान प्रतिनिधीसाठी एकमताने आलेले ठराव घेणे सुरू झाले आहे. त्यानंतर प्रारूप, अंतिम मतदार यादी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याअनुषंगाने तालु्क्यातील सर्व सहकारी संस्थांना ठराव नमुना प्रत पत्र पाठविण्यात आले आहेत.

----

संचालकपद कोणाकडे काळ ठरवणार

अक्कलकोट तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटी- ८९, त्याबरोरच नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण, सेवक कर्मचारी पतसंस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, व इतर अशा १२५ ते १५० मतदार आहेत. यामध्ये ३१ जुलै-१८ पूर्वी असणाऱ्या सभासदांपैकीच एकाच्या नावे संस्थेकडून ठराव करता येणार आहे. एकंदरीत या निवडणुकीची भिस्त शेवटी विकास सेवासोसायटीवरच अवलंबून असणार आहे. त्यावर अनेक वर्षांपासून सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्या मदतीने पुन्हा एकदा संचालकपद ताब्यात ठेवण्यात यशस्वी होणार का म्हेत्रे विरोधकांना एकत्रित करून गनिमी कावा करणार हे काळच ठरवणार आहे.

----

Web Title: Strong fielding from former MLAs; Struggling to get the right to vote resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.