एसटीचेे स्टिअरिंग लाॅक झाले अन् कारला फरफटत नेले, चालकासह दोघे जखमी

By काशिनाथ वाघमारे | Published: May 21, 2023 08:18 PM2023-05-21T20:18:01+5:302023-05-21T20:18:22+5:30

पंढरपूर- मल्हार पेठ रस्त्यावरील अपघात

ST's steering locked and the car went into overdrive, injuring both the driver and the driver | एसटीचेे स्टिअरिंग लाॅक झाले अन् कारला फरफटत नेले, चालकासह दोघे जखमी

एसटीचेे स्टिअरिंग लाॅक झाले अन् कारला फरफटत नेले, चालकासह दोघे जखमी

googlenewsNext

सोलापूर : भरधाव एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झाले आणि कारला फरफटत नेल्याची घटना पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घडली. या अपघातात कारचालकासह दोघे जण जखमी झाले. कारचालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
हा अपघात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कटफळ (शेरेवाडी) स्टॉपजवळ घडला. कार चालक सोमनाथ गेनदेव शिंदे (३५) व केदारी भागवत पाटील, (वय ४५, दोघेही रा. निमगाव, ता. माढा), अशी जखमींची नावे आहेत.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार माढा तालुक्यात निमगाव येथील सोमनाथ गेनदेव शिंदे व त्यांचा मित्र केदारी भागवत पाटील हे दोघे जण मिळून रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार (एमएच ४५ एएल ८०२२)मधून सांगली जिल्ह्यात आटपाडी येथे विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. राज्य परिवहन महामंडळ, पाटण आगाराची एसटी बस (एमएच १४ / बीटी ४१०५) कराडहून सोलापूरला निघाली होती. दोन्ही वाहनांची पंढरपूर- मल्हार पेठ महामार्गावर कटफळ शिवारात समोरासमोर धडक झाली. अपघातात चालक सोमनाथ शिंदे व केदारी पाटील हे दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर एसटी बसचेेे स्टिअरिंग लाॅक झाले आणि एसटीने कार तशीच पुढे फरफटत नेल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने एसटीमधील प्रवाशांना काहीही झाले नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ, पोलिस नाईक केदारनाथ भरमशेट्टी, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली.

Web Title: ST's steering locked and the car went into overdrive, injuring both the driver and the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.