चॉकलेटच्या आमिषाने बार्शीत वृद्धांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:16 IST2024-08-27T13:15:55+5:302024-08-27T13:16:13+5:30
दोन वृद्ध नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्टला सायंकाळी घडली.

चॉकलेटच्या आमिषाने बार्शीत वृद्धांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क, वैराग (जि. सोलापूर) : चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून अकरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यामध्ये दोन वृद्ध नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्टला सायंकाळी घडली.
याप्रकरणी निळू बळीराम माने (वय ६०) आणि आगतराव मुळे (८०) अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोघेजण मुलीचा हात धरून खाऊ, चॉकलेट आणि पैसे देत होते. ही बाब पीडीत मुलीच्या आईच्या लक्षात आली होती.
चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले. दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील, ते मी देईन, तू मंदिराकडे येत जा, असे म्हणत पाचशे रुपये दिले, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.