विद्यार्थिनी, पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
By admin | Published: June 14, 2014 01:49 AM2014-06-14T01:49:15+5:302014-06-14T01:49:15+5:30
डीएडच्या परीक्षेतील संगनमताने कॉपी प्रकरण
अक्कलकोट : डीएडच्या परीक्षेत संगनमताने कॉपी करताना शाब्दी अध्यापक विद्यालयाची विद्यार्थिनी व पर्यवेक्षक आढळून आल्याने त्यांच्यावर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ही घटना १२ जून रोजी दुपारी २ ते ५ दरम्यान काशी विश्वेश्वर अध्यापक विद्यालयात घडली़
गुरुवारी दुपारी २ वाजता कृषी संशोधन व नवोपक्रम प्रक्रिया या विषयाचा पेपर सुरू झाला़ त्यानंतर तब्बसुम मशाक आसम नदाफ ही विद्यार्थिनी व पर्यवेक्षक जे़ एम़ प्रचंडे हे संगनमत करून कॉपी करत असताना आढळून आले़
केंद्रसंचालक राम अंबाजी इंगळे यांनी तबस्सूम नदाफ व जे. एम. प्रचंडे यांच्या विरोधात अक्कलकोटच्या उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार पोलिसांनी परीक्षा अॅक्ट ७ व ८ भादंवि १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव हे करीत आहेत़