खामगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी एनएमएमएसमध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:38+5:302021-08-24T04:26:38+5:30
कुसळंब : बार्शी तालुक्यातील हम खामगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा (एनएमएमएस) शैक्षणिक वर्षाची निवड यादी जाहीर ...
कुसळंब : बार्शी तालुक्यातील हम खामगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा (एनएमएमएस) शैक्षणिक वर्षाची निवड यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. शाळेचे संस्थापक प्रभाकर डमरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. साक्षी कैलास मडके हिने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. मयुर विनोद पवार हिने जिल्ह्यात युजेएनटीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. श्रेया संजय बोकेफोडे हिने जिल्ह्यात एससीमधून ११वा क्रमांक पटकावला. ज्ञानेश्वरी आप्पासाहेब मोरेने जिल्ह्यात ७०वा क्रमांक पटकावला. आजतागायत माध्यमिक आश्रम शाळेतून ५५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना काकासाहेब काटे, हरेल भीमाशंकर, वाघमारे शिवाजी, ठोंबरे विनोद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन डमरे, गणेश उपरे, विनोद पवार, संजय बोकेफोडे, कैलास मडके, आप्पा मोरे, सुहास माळी, प्रमोद मुंडे, तानाजी थिटे, शिवाजी शिंदे, बाळासाहेब वांगदरे, विलास साबळे, प्रशांत काशीद, रवींद्र धावडे उपस्थित होते.
----
फोटो : २३ कुसळंब
खामगाव आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केल्यानंतर संस्थापक प्रभाकर डमरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.