मोबाईल घेऊन न दिल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांने जीवन संपवले

By दिपक दुपारगुडे | Published: October 1, 2023 06:35 PM2023-10-01T18:35:23+5:302023-10-01T18:36:04+5:30

घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

students of class 12th ended their lives because they were not allowed to carry mobile phones | मोबाईल घेऊन न दिल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांने जीवन संपवले

मोबाईल घेऊन न दिल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांने जीवन संपवले

googlenewsNext

दीपक दुपारगुडे, सोलापूर : कुसुर येथील बारावीत शिकणाऱ्या एका तरुण मुलाने आई-वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आकाश राजकुमार पुजारी (वय १८) राहणार कुसुर (तालुका दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश पुजारी हा मंद्रूप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. तो आपल्या आई वडिलांना सतत मोबाईल घेऊन द्या, अशी मागणी करायचा. मात्र परिस्थिती नसल्याने आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही. मोबाईल वरून तो घरात आई-वडिलांशी वाद घालायचा. काल रात्री उशिराने तो घरी आला. आई वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

आज सकाळी आई-वडिलांनी शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर मंद्रूप पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मंद्रूप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

Web Title: students of class 12th ended their lives because they were not allowed to carry mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.