विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप

By काशिनाथ वाघमारे | Published: April 6, 2024 07:07 PM2024-04-06T19:07:56+5:302024-04-06T19:08:43+5:30

जूनही गालावर सूज असल्यामुळे एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.

Students safe from venomous bee attack | विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप

विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप

सोलापूर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा येथे बेंच सरकवते वेळी विषारी मधमाशांनी विद्यार्थ्यांना चावा घेतल्याची घटना घडली. चावा घेतलेल्या २० ते २२ वयोगटातील १० विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल केले आहे. यामधील ९ विद्यार्थ्यांना उपचार करून २४ तासांच्या देखरेखीनंतर घरी सोडण्यात आले. अजूनही गालावर सूज असल्यामुळे एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कोडलकर, डॉ. निखिल कोडलकर यांना विद्यार्थ्यांवर योग्य व यशस्वी उपचार करण्यात यश आल्याने संभाव्य धोका टळला. यावेळी अधिपरिचारिका फुलन आगलावे, सुवर्णा सगरे, तेजश्री मेटकरी, सारिका कोळेकर, वैशाली शिंदे, सुनीता सातलोलु यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Students safe from venomous bee attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.