विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांची उत्कृष्ट मांडणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:12+5:302021-01-14T04:19:12+5:30
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड कॉलेजमध्ये भारत सरकार शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेलकडून ...
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड कॉलेजमध्ये भारत सरकार शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेलकडून आयआयसी इनोव्हेशन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन सिंहगड अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत हाेते.
यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. शाम कुलकर्णी, समन्वयक प्रा. अतुल आराध्ये, प्रा. महिंद्र काटकर, प्रा. संगमनाथ उप्पीन, शशिकांत गिड्डे, प्रा. अमोल जगदाळे, अभिजीत पाटणे, राजाराम राऊत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी इनोव्हेशन सेल अंतर्गत घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला, तर डॉ. शाम कुलकर्णी यांनी स्पर्धेची नियमावली, स्वरूप व स्पर्धेशी निगडित इतर माहिती दिली.