परीक्षेत कॉफी करताना पकडलं म्हणून विद्यार्थ्यांनी सुपरवायझरला केली मारहाण, सांगोला येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:55 PM2017-11-10T15:55:25+5:302017-11-10T15:55:32+5:30

परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़

The students took the supervisor as a result of the coffee in the exam, the incident in Sangola | परीक्षेत कॉफी करताना पकडलं म्हणून विद्यार्थ्यांनी सुपरवायझरला केली मारहाण, सांगोला येथील घटना

परीक्षेत कॉफी करताना पकडलं म्हणून विद्यार्थ्यांनी सुपरवायझरला केली मारहाण, सांगोला येथील घटना

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़
सोलापूर विद्यापीठाच्याच्या वतीने सध्या बीए़ बीकॉमच्या परीक्षा सुरू आहेत़ परीक्षा सुरू असताना सांगोला येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे बीकॉम २ च्या परीक्षेवेळी पेपर सुरू असताना सुपरवायझर सुयोग शशिकांत दिवटे (वय २५ रा़ वासुद रोड, सांगोला)यांना सुनिल संतोष पाटील (वय २३, रा़ पाटील वस्ती सांगोला) हा विद्यार्थी कॉपी करत असल्याचं आढळून आले़ त्यानंतर सुपरवायझर दिवटे यांनी विद्यार्थी सुनिल पाटील यास कॉपी करण्यास प्रतिबंध केला व नंतर त्यांचा पेपर काढून घेतला़ यानंतर चिडलेल्या विद्यार्थ्यांने सुपरवायझर दिवटे यांना शाळेबाहेर गाठून कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली़या सुपरवायझर सुयोग दिवटे यांच्या छातीवर, डोक्यात, दंडावर, पायावर जखमा झाल्या आहेत़  या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली आहे़ पुढील तपास पोना कांबळे हे करीत आहेत़ 

Web Title: The students took the supervisor as a result of the coffee in the exam, the incident in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.