विद्यार्थिनींना मोफत मिळणार एमएस-सीआयटी, टॅलीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:06+5:302021-03-13T04:41:06+5:30

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील एमकेसीएलच्या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये एमएस-सीआयटी व टॅली प्रशिक्षणची योजना ...

Students will get free MS-CIT, Tally training | विद्यार्थिनींना मोफत मिळणार एमएस-सीआयटी, टॅलीचे प्रशिक्षण

विद्यार्थिनींना मोफत मिळणार एमएस-सीआयटी, टॅलीचे प्रशिक्षण

googlenewsNext

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील एमकेसीएलच्या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये एमएस-सीआयटी व टॅली प्रशिक्षणची योजना आखली आहे. त्यामध्ये अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर आदी तालुक्यामधून ९० संगणक केंद्रामध्ये मोफत एमएस-सीआयटी व टॅलीचे संगणक प्रशिक्षण देण्याचे आयोजित केले आहे.

शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी एमएस-सीआयटी प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण घेणारी विद्यार्थिनी दहावी उत्तीर्ण व ग्रामीण भागातील असावी, तहसीलदारांचा १ लाख २० हजारांचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, आयडेंटी साइज दोन फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. विद्यार्थिनी व महिलांसाठी १५ मार्च ते १५ मेपर्यंत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सभापती स्वाती शटगार यांनी दिली.

Web Title: Students will get free MS-CIT, Tally training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.