तीन वर्षांपासून उपबाजाराचे ठराव डीडीआरच्या गठ्ठ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:26+5:302021-07-26T04:22:26+5:30
---- अंतर्गत रस्ते घेतले..शेतकऱ्यांचे टाळले.. सोलापूर बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक श्रीमंत बंडगर यांनी उत्तर व दक्षिण तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी ...
----
अंतर्गत रस्ते घेतले..शेतकऱ्यांचे टाळले..
सोलापूर बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक श्रीमंत बंडगर यांनी उत्तर व दक्षिण तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधीची तरतूद करावी असा ठराव मांडला होता. मात्र, हा ठराव घेतला नाही. बाजार समितीतील अंतर्गत रस्ते करण्याच्या ठरावाचा पाठपुरावा करून टेंडर प्रक्रिया सुरू आहे.
---
डीडीआर कार्यालयही
बाजार समितीकडून आलेले उपबाजार सुरू करण्याचे ठराव तीन वर्षांपासून जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयातील गठ्ठ्यात फाईलबंद केले आहेत. तीन वर्षांत संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्याने पुढील कार्यवाहीसाठी का ठराव पाठविले नाहीत?, हेही कोडे आहे. डीडीआर कार्यालयानेही मंजुरीसाठी प्रयत्न केले नाहीत.
----
जिल्ह्यात २७ उपबाजार..
जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांनी २७ उपबाजार सुरू केले आहेत. मात्र, राज्यात आघाडीवर असलेल्या सोलापूर बाजार समितीला एकही उपबाजार नाही. अक्कलकोटला मैंदर्गी, दुधनी, अकलूजला माळशिरस, नातेपुते, वेळापूर, पिलीव, शिंदेवाडी, बार्शीला वैराग, करमाळ्याला केम, जेऊर, जिंती, कुर्डूवाडीला मोडनिंब, टेंभुर्णी व माढा, मंगळवेढ्याला नंदेश्वर, लक्षीदहिवडी, हुन्नूर, मोहोळला अनगर, पाटकुल, बेगमपुर, कामती, कुरुल, शेटफळ इत्यादी २७ गावांत उपबाजार मंजूर आहेत.
---