अनुदान कमी झालं अन् खताच्या किंमती वाढल्या! बळीराजाचं कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:23+5:302021-04-09T04:23:23+5:30
शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ...
शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ५० किलो बॅगची झाली आहे. यापूर्वी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. याच प्रमाणे १०:२६: २६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५:१५:१५ या खताची किंमत १५०० रुपये प्रति पॅक झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२:३२:१६ या खताची किंमत १८०० रुपये प्रति बॅग झाली असून यापूर्वी या खताची किंमत १२५० रुपये होती. तर २०:२०:० या खताची किंमत १३५० रुपये झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत ९५० रुपये होती.
तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अद्याप इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत.
सध्या बाजारात जुन्या दराचा लाखो मेट्रिक टन खते गोडावूनमध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता आहे.
गेल्या पंधरा - वीस वर्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात खताच्या किमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. केंद्र सरकार रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास टाळाटाळ करत असून रखडलेले अब्जावधी रुपयांचे अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली आहे. यामुळे आता रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केली आहे.
कोट घेणे...
इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. एवढी महाग खते झाली तर शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापरण्याचे प्रमाण कमी होईल. या दरवाढीचा शेतकरी म्हणून मी निषेध करतो.
-
राजेंद्र बारकुंड, शेतकरी चिखलठाण
---
दरवाढ अन्यायकारक असून, यापुढील काळात शेतकरी खत वापराचे प्रमाण कमी करतील. केंद्र शासनाने पुन्हा विचार करून रासायनिक खतांवरील अनुदान वाढवावे व रासायनिक खत उत्पादन कंपन्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ कंपन्यांना द्यावे तरच खतांची दरवाढ नियंत्रणात राहील.
- धुळाभाऊ कोकरे, शेतकरी कुगाव.
---
कोरोनामुळे आयात होणारी खते बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ॲसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्या आहेत यामुळे ही दरवाढ अटळ आहे. आता केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
----