success ; जैन मंदिरातील पुजाºयाचा मुलगा बनला चार्टर्ड अकौंटंट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:11 PM2019-01-29T14:11:04+5:302019-01-29T14:17:59+5:30

सोलापूर : इच्छाशक्ती असली की सर्वकाही साध्य होतं म्हणतात ते अगदी खरंय.. आर्थिक स्थिती बेताची.. वडील जैन मंदिरात पुजारी ...

success; Chantered accountant became the son of Puja in Jain temple! | success ; जैन मंदिरातील पुजाºयाचा मुलगा बनला चार्टर्ड अकौंटंट !

success ; जैन मंदिरातील पुजाºयाचा मुलगा बनला चार्टर्ड अकौंटंट !

Next
ठळक मुद्देइच्छाशक्ती असली की सर्वकाही साध्य होतं म्हणतात ते अगदी खरंय.आर्थिक स्थिती बेताची.. वडील जैन मंदिरात पुजारी अन् आईचा घरगुती बांगड्याचा व्यवसायसर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या तरुणानं आई-वडिलांच्या कष्टाचं चिज

सोलापूर : इच्छाशक्ती असली की सर्वकाही साध्य होतं म्हणतात ते अगदी खरंय.. आर्थिक स्थिती बेताची.. वडील जैन मंदिरात पुजारी अन् आईचा घरगुती बांगड्याचा व्यवसाय.. अशा सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या तरुणानं आई-वडिलांच्या कष्टाचं चिज करीत हार न मानता चक्क चार्टर्ड अकौंटंट ही सन्मानजनक असलेली पदवी मिळवत तरुणाईपुढे आदर्श निर्माण केला आहे. संतोष वसंतराव धुमाळ असं या जिगरबाज तरुणाचं नाव. 

कमलानगर परिसरात वास्तव्यास असलेले वसंतराव धुमाळ तसे धार्मिक वृत्तीचे. दोन मुली अन् एक मुलगा सोबत संसाराला समर्थपणे साथ देणारी सहचारिणी सरलाबाई. अशा या गोजिरवाण्या कुटुंबात संतोष सर्वात लहान अर्थात शेंडीफळ. दोन मुलींची लग्नं झालेली. यामुळे आई-वडिलांना  सहकार्य करण्यापासून आपला शिक्षणाचा गाडा अशा दुहेरी जबाबदारीतून संतोषनं हे यश मिळवलं आहे. मुळात धुमाळ कुटुंब अत्यंत सालस, कष्टाळू अन् मितभाषी. यामुळं प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आपुलकी. या बळावरच जैन कासार समाजातील मंडळींनी त्यांना मदतीचा हात दिला.

 पहिली ते सातवीपर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या संतोषने दहावीला ८० टक्के गुण मिळविल्यानंतर बांगडीचा व्यवसाय करणाºया आई सरलाबाई यांनी त्याची गणितामध्ये असलेली आवड लक्षात घेऊन सी.ए. होण्याचा सल्ला दिला. यानुसार जैन गुरुकुलमध्ये बारावी झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे  नोकरी करीत वालचंद कॉलेजमध्ये बी.कॉम. पदवी परीक्षेसाठी प्रवेश घेऊन आर्टिकलशिपसाठी मुंबई येथे राहिला. नोकरी करीतच त्याने स्वत:चे शिक्षण स्वकमाईतून घेतले. अन् जिद्दीने यंदाच्या वर्षात  सी.ए. परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे !
- परिस्थिती प्रत्येकाला खूप काही शिकवते. माझ्याही बाबतीत हेच झालं. आईची जुनी दहावी.तिला शिक्षणाबद्दल नेहमीच आस्था असल्यानं तिच्या प्रेरणेमुळेच मी हे यश संपादन करु शकलो. एकीकडे वडील जैन कासार मंदिरात पुजारी आणि आईचा संसाराला हातभार लावण्यासाठी घरीच बांगड्याचा व्यवसाय.  

ही स्थिती बदलून टाकायची हे मनोमन ठरवलं. लहानपणापासून गुरुजींनी शिकवलेले ‘केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे’ हे वाक्य नेहमीच कानामध्ये घुमायचे. पहिला, दुसरा प्रयत्न असफल ठरला  तरी हार न मानता मी जिद्दीने पुन्हा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. आणखी खूप मोठं व्हायचंय आणि आई-वडिलांचं नाव रोषण करायचंय, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया संतोष धुमाळनं ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: success; Chantered accountant became the son of Puja in Jain temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.