पांडे येथे विहिरीत पडलेल्या घोणसला वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:30+5:302021-07-10T04:16:30+5:30
करमाळा : पांडे येथील सचिन भोसले यांच्या वस्तीतील विहिरीत पडलेल्या सहा फूट लांब आणि तीन किलो वजनाच्या घोणस सापाला ...
करमाळा : पांडे येथील सचिन भोसले यांच्या वस्तीतील विहिरीत पडलेल्या सहा फूट लांब आणि तीन किलो वजनाच्या घोणस सापाला एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे.
गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोटर बंद पडल्याने दुरुस्तीसाठी दस्तगीर मुजावर व सचिन भोसले विहिरीवर गेले. भला मोठा साप पाणी असलेल्या विहिरीत पडलेला दिसला.
विहीर खोल असल्याने साप काढणे शक्य नव्हते. त्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाकडे सुनील भोसले व दस्तगीर मुजावर यांनी संपर्क साधला. वनपाल व वनरक्षण अधिकारी नारायण चव्हाण, सर्पमित्र फारूख मदारी, आलिम मदारी हे सारे विहिरीजवळ दाखल झाले. दोर, काटेरी झुडूप व पिशवीच्या साहाय्याने एक तासच्या प्रयत्नानंतर वन कर्मचाऱ्यांना सापाचा जीव वाचण्यात यश आले. त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.
---
फोटो : ०८ पांडे
विहिरीत पडलेल्या सापाला वाचवून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडताना धनंजय कुंभार, आमोल भोसले, गणपत जाधव, विष्णू फरतडे, सचिन भोसले.