Success Story: आश्रमशाळेत शिकणारी प्रिती बनली PSI, MPSC परीक्षेत राज्यात 15 वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 03:08 PM2022-03-17T15:08:01+5:302022-03-17T15:09:46+5:30

प्रिती लांडे हिचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण खामगाव आश्रमशाळेत झाले. पदवीचे शिक्षण लोकमंगल कॉलेजमध्ये झाले.

Success Story: Preeti, who was studying in an ashram school, became PSI, achieving success by coming 15th in the state | Success Story: आश्रमशाळेत शिकणारी प्रिती बनली PSI, MPSC परीक्षेत राज्यात 15 वी

Success Story: आश्रमशाळेत शिकणारी प्रिती बनली PSI, MPSC परीक्षेत राज्यात 15 वी

googlenewsNext

सोलापूर/ कुसळंब : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत खामगाव आश्रमशाळेची विद्यार्थिनी प्रिती दत्तात्रय लांडे महिला प्रवर्गातून राज्यात पंधरावा क्रमांक पटकावत यश संपादन केले. त्यामुळे आश्रमशाळेचे संस्थापक प्रभाकर डमरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रिती लांडे हिचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण खामगाव आश्रमशाळेत झाले. पदवीचे शिक्षण लोकमंगल कॉलेजमध्ये झाले. पदवीच्या प्रथम वर्गात शिकत असताना वडील दत्तात्रय लांडे यांचे अकाली निधन झाले अन् वडिलांचे छत्र हरपले. परंतू परिस्थिती समोर हार न मानता आई शोभा लांडे तिच्या शिक्षणाला मदत करीत प्रोत्साहन दिले. मुलगी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निकाल ऐकताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. यावेळी शाळेचे संस्थापक प्रभाकर डमरे यांच्या हस्ते फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन तिचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक सचिन डमरे, डी. एन. कांबळे, जि .यू. उपरे, किरण वाकुरे यांनी तिच्या यशाचे कौतुक केले.

Web Title: Success Story: Preeti, who was studying in an ashram school, became PSI, achieving success by coming 15th in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.