बार्शीत खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:35+5:302021-06-20T04:16:35+5:30

देशमुख यांनी शेतीत सीताफळ, द्राक्ष, खजूर, गोड चिंच, ड्रॅगन आदी फळपिकांची लागवड केली आहे. २००८-०९ साली ३० बाय ...

Successful experiment of date cultivation in Barshi | बार्शीत खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी

बार्शीत खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी

Next

देशमुख यांनी शेतीत सीताफळ, द्राक्ष, खजूर, गोड चिंच, ड्रॅगन आदी फळपिकांची लागवड केली आहे. २००८-०९ साली ३० बाय ५ फुट अंतरावर देशी लाल व पिवळ्या रंगांच्या खारीक शेतीची लागवड केली. बियांपासून रोपे तयार केली. लागवड करताना आगस्ट महिन्यात आठशे झाडांची लागवड केली. त्यामध्ये नर-मादी वेगळे करून २०० झाडे सध्या ठेवली आहेत. चौथ्या वर्षी झाडांना फळ लागण्यास सुरुवात झाली. एका झाडाला वीस किलोपासून १०० किलोपर्यंत माल निघतो. तसेच एका झाडाला दोन ते दहा घड लागतात. यासाठी दरवर्षी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो खजूर विक्रीमधून दोन एकरात साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

---

खजूर पिकासाठी तंत्र

या पिकाला जानेवारी ते मे या महिन्यात पाणी लागते. त्याला ही ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते. या झाडांना औषधांची फवारणी करावी लागत नाही. झाडांचे काटे काढणे आणि नर-मादी पॉलिनेशन करणे, घड वजन आल्यावर बांधणे, तसेच पावसापासून सरक्षण होण्यासाठी घडाला प्लॅस्टिकचे आच्छादन बांधणे ही कामे करावी लागतात. जून-जुलैमध्ये या पिकाची काढणी सुरू होते.

---

बाजारपेठ ही जागेवरच

राजाभाऊ देशमुख यांच्यासोबत त्यांचे बंधू अनिल, रवींद्र, विलास व पुतण्या विशाल देशमुख हेदेखील त्यांना शेतीसाठी मदत करतात. विशेष म्हणजे देशमुख यांना ही खारीक विकण्यासाठी कोणत्याही बाजारात जाण्याची गरज पडत नाही. बार्शी सोलापूर व बार्शी तुळजापूर रस्त्यावर शेताच्या जवळच ते विक्रीचा स्टॉल लावतात. यामध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार रुपयांच्या खारीक विक्री होती.

---

फोटो : १९ बार्शी

बार्शीतील शेतकरी आपल्या शेतात खजूर पिकासोबत

---

===Photopath===

190621\img-20200712-wa0013.jpg

===Caption===

बार्शीच्या राजाभाऊ देशमुख यांचा खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी; एकरात खर्च वजा जाता मिळवतात सव्वा दोन लाखाचे उत्पन्न

Web Title: Successful experiment of date cultivation in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.