असाही प्रामाणिकपणा; रेल्वेतील लॉकफिटर राजूने केली ९० हजारांची बॅग परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:58 PM2021-02-04T12:58:18+5:302021-02-04T12:58:24+5:30
सोलापूर - रेल्वेत विसरलेली बॅग मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात काम करणारा लॉकफिटर राजू गायकवाड याने ९० हजार रूपये असलेली ...
सोलापूर - रेल्वेत विसरलेली बॅग मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात काम करणारा लॉकफिटर राजू गायकवाड याने ९० हजार रूपये असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली.
दरम्यान, बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास हसन एक्स्प्रेसने दीपा चौहान या महिला प्रवासीने गुलबर्गा ते सोलापूर असा प्रवास केला. गर्दीच्या नादात त्या महिलेने रेल्वे सीटवर ठेवलेली बॅग तशीच विसरून घरी गेल्या होत्या. सोलापूर रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस थांबली असता रेल्वेचे सर्व दरवाजे बंद करणारा लॉकफिटर राजू गायकवाड यास बोगी नं डी ४ येथे बॅग आढळून आली. तातडीने राजू याने ही बॅग स्टेशन प्रबंधक कार्यालयात जमा केली. त्यानंतर बॅगबाबत चौकशीसाठी आलेल्या दीपाला सिनिअर सेक्शन इंजिनिअर श्रीकृष्ण सुरवसे यांनी बॅगची ओळख पटवून स्टेशन प्रबंधक एस. के. सिंग व के. मोहनदास यांच्या समक्ष ९० हजारांची बॅग महिला प्रवाशाला परत केली. राजू गायकवाड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. -----------