कोरोनात सुदर्शन क्रिया ठरतेय फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:09+5:302021-05-25T04:25:09+5:30
लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ऑनलाइन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग नोंदवून योग प्राणायाम व सुदर्शन ...
लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ऑनलाइन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग नोंदवून योग प्राणायाम व सुदर्शन क्रियेचा लाभ घेत आहेत. सुदर्शन क्रिया हे साधे सरळ लयबद्ध श्वासोच्छ्वास करण्याचे एक तंत्र आहे. या तंत्रामुळे ताणतणाव, थकवा नाहीसा तर होतोच, पण राग, वैफल्य, नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनाही नष्ट होतात. यामुळे पुढील ७ ते १३ जूनदरम्यान होणाऱ्या ऑनलाइन शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे प्रा. विरेश होळकुंदे यांनी संगितले.
कोट :::::::::::::::::
आर्ट ऑफ लिव्हिंगमधील सुदर्शन क्रियेमुळे कोविड रुग्ण तीन ते चार दिवसांत बरे होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ही क्रिया रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर ठरते.
- प्रा. विरेश होळकुंदे,
प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर