कुलगुरूंच्या मनमानी विरोधात सुटाची निदर्शने

By admin | Published: July 17, 2014 12:50 AM2014-07-17T00:50:49+5:302014-07-17T00:50:49+5:30

बेकायदेशीर कामांविरोधात संताप

SUDA's demonstrations against the Vice-Chancellor's arbitrariness | कुलगुरूंच्या मनमानी विरोधात सुटाची निदर्शने

कुलगुरूंच्या मनमानी विरोधात सुटाची निदर्शने

Next


सोलापूर : विद्यापीठ कायदा, परिनियम, शासकीय पत्रांना छेद देत बेकायदेशीर व मनमानी कामकाजाचा सपाटा लावल्यामुळे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या विरोधात सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी २ वा. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. हनुमंतराव आवताडे व कार्यवाह प्रा. देवेंद्र मदने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
अधिकार मंडळावर बेकायदेशीर निवडी, विद्यापरिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर सदस्य निवडताना परिनियम एस-४९६ ला दिलेला छेद, शिक्षक सिनेट निवडणुकीची अधिसूचना काढताना परिनियम एस-३८८ (।।) ला दिलेला छेद , व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य निवडताना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४-२७ (१) (जे) छेद देण्यात आला आहे. अभ्यास मंडळे गठित करताना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४-३७ (डी) वगळण्यात आला आहे आदी विविध बेकायदेशीर कामे कुलगुरूंच्या कालावधीत झाली आहेत. याबाबत ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

Web Title: SUDA's demonstrations against the Vice-Chancellor's arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.