अचानक बँकेतून रकमा कटल्या.. एकच गोंधळ, खातेदार घाबरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:56+5:302021-03-27T04:22:56+5:30
प्रत्येक व्यापारी खातेदारांंच्या करंट व सीसी खात्यातून प्रत्येक देवाणघेवाणीस ६ रुपयांप्रमाणे चार्जेस रक्कम आकारली जाते, असे स्पष्ट करण्यात आले. ...
प्रत्येक व्यापारी खातेदारांंच्या करंट व सीसी खात्यातून प्रत्येक देवाणघेवाणीस ६ रुपयांप्रमाणे चार्जेस रक्कम आकारली जाते, असे स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी इतर राष्ट्रीय बँकेप्रमाणे संबंधित खात्याला वार्षिक ५५० रुपये आकारणी करावी, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी यावेळी शाखा व्यवस्थापकाकडे केली.
कुर्डूवाडी शहरातील व्यापारी आपल्या खात्यावरून गुरुवार व शुक्रवारी एकदम पैसे डेबिट झाले म्हणून आपापसांत एकमेकांंना फोन करीत होते. नेमका काय प्रकार झाला हे त्यांंना समजत नव्हते. सर्व व्यापारी युनियन बँकेत गोळा झाले व बँक खात्यावरील शिल्लक रकमेची तपासणी करू लागले. खात्यातून पैसे कपात झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यात मिळालेल्या माहितीप्रमाणे आनंद मेडिकल ७ हजार रुपये, पूनम एजन्सी २३ हजार रुपये, वर्धमान किराणा ५ हजार रुपये, सुनंदा कलेक्शन २ हजार १५० रुपये, मंगल वस्त्रभांडार ३ हजार रुपये, विकास लाईट हाऊस १२ हजार ५०० रुपये, तर काहीजणांच्या खात्यातून यापेक्षाही अधिक रकमा कपात झाल्या आहेत.
परंतु आर. बी. आय.च्या नियमावर बोट ठेवत शाखा व्यवस्थापक चोपडे यांनी लेजर चार्जेसप्रमाणे सर्व रकमा डेबिट केल्या असल्याचे सांगितल्याने यावर पडदा पडला; परंतु इतर राष्ट्रीय बँकांप्रमाणे वार्षिक ठरावीक रक्कम कपात करावी, अशी मागणी मात्र यावेळी व्यापाऱ्यांतून करण्यात आली.
----
शहरातील संबंधित व्यापाऱ्यांच्या सीसी व करंट खात्यातून ज्या रकमा खात्यातून डेबिट करण्यात आल्या आहेत, त्या बँकेच्या नियमानुसार बरोबर आहेत. प्रत्येक बँकेचे नियम आहेत.
निलेश चोपडे,
बँक मॅनेजर, युनियन बँक, कुर्डूवाडी
--
कुर्डूवाडी शहरातील व्यापाऱ्यांच्या सीसी व करंट खात्याला इतर राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे युनियन बँकेनेही वार्षिक ५५० रुपये निश्चित असा दर आकारावा. त्यामुळे येथील व्यापारी वर्गात संबंधित बँकेबद्दल विश्वास निर्माण होईल.
- आगरचंद धोका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, कुर्डूवाडी
. फोटो-
युनियन बँक, कुर्डूवाडी