एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:17 PM2019-02-01T13:17:26+5:302019-02-01T13:18:25+5:30
सोलापूर : ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपये इतकी एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर ...
सोलापूर: ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपये इतकी एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटिसा बजावल्या असून, ३९ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. १३५ कारखान्यांवर एक व दोन फेब्रुवारी रोजी होणाºया सुनावणीनंतर कारवाई होणार आहे.
राज्यात १८५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. यापैकी केवळ ११ साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंतची एफआरपीची संपूर्ण रक्कम दिली आहे. उर्वरित १७४ साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी ३५ लाख रुपये थकविले आहेत. यामध्ये १५ टक्क्यांपर्यंत एफआरपी (रास्त आणी किफायतशीर दर) देणाºया ३९ साखर कारखान्यांवर आरआरसी नुसार कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी या कारखान्यांची साखर व अन्य मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून शेतकºयांचे पैसे देणार आहेत.
उर्वरित १३५ साखर कारखान्यांनी १६ ते ९९ टक्के इतकी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली आहे. अशा कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त गायकवाड घेणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी पुणे व कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची तर २ फेब्रुवारी रोजी अन्य जिल्ह्यांतील कारखान्यांची सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर या साखर कारखान्यांवर कारवाई निश्चित होणार आहे.
सोलापूरच्या सहा कारखान्यांकडे २१४ कोटी
- - राज्यातील १८५ साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत ४२७ लाख मे. टन गाळप केले असून, याची एफआरपीनुसार १० हजार ४८७ कोटी ३४ लाख रुपये देय आहे. त्यापैकी ५ हजार १६६ कोटी ९९ लाख रुपये कारखान्यांनी दिले असून, ५ हजार ३२० कोटी ३६ लाख देणेबाकी आहे.
- - सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर (३९ कोटी ४० लाख), कूर्मदास (१४ कोटी २० लाख), विठ्ठल रिफायनरी (४२ कोटी १५ लाख), गोकुळ (४२ कोटी १ लाख), जयहिंद (२० कोटी २४ लाख) व बबनराव शिंदे केवड (५५ कोटी ७२ लाख) रुपये असे २१३ कोटी ७३ लाख रुपये थकल्याने या कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्यात येत आहे.
१५ जानेवारीअखेरीस शून्य एफआरपी दिलेले कारखाने
कारखाना रक्कम कोटींत
- तात्यासाहेब कोरे-वारणा ११६.०२
देशभक्त आर. के. - पंचगंगा ७४.३९
- किसनवीर भुर्इंज ६३.२७
- किसनवीर-प्रतापगड ८.४१
- किसनवीर-खंडाळा २२.३०
- समृद्धी शुगर-जालना ४२.५६
- वैद्यनाथ-बीड ३२.६४
- त्रिधारा शुगर-परभणी १७.०६
- शैला अतुल शुगर-उस्मानाबाद ५.३२
- शंभू महादेव-उस्मानाबाद १०.३१
- पांगेश्वर-लातूर १७.८०