ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 10:57 AM2017-11-25T10:57:01+5:302017-11-25T10:58:17+5:30
राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप झाले आहे.
अरुण बारसकर
सोलापूर दि २५ : राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप झाले आहे.
राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते. त्रुटी पूर्ण करणाºया सर्वच कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने परवाने दिले असून, गाळपही सुरू केले आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र बºयापैकी असल्याने राज्यभरातील सर्वच सातही विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर व पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातही उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मागील दोन वर्षे दुष्काळ असल्याने राज्यभरातच उसाचे क्षेत्र घटले होते; मात्र यवर्षी ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखान्यांनी तर पुणे विभागातील ५७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळप झाले असून राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप आहे.
अहमदनगर विभागातील अहमदनगरच्या १९ व नाशिकच्या दोन अशा २१ साखर कारखान्यांनी १७ लाख १० हजार १६५ मे.टन गाळप केले आहे. औरंगाबाद विभागातील नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांनी ९ लाख ७७ हजार २४० मे.टन गाळप केले आहे. नंदूरबारचे तीन, जळगावचे दोन, औरंगाबादचे तीन, जालन्याचे पाच तर बीडचे पाच कारखाने सुरू झाले आहेत. नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी १४ लाख १३ हजार १७७ मे.टन ऊस गाळप केले आहे. अमरावती विभागातील यवतमाळच्या दोन कारखान्यांनी एक लाख तर नागपूरचा एक साखर कारखाना सुरू झाला आहे.
----------------------------
अहमदनगरचे १९ कारखाने सुरू
च्मागील वर्षी संपूर्ण राज्यातच उसाचे क्षेत्र कमी होते. यावर्षी ऊस क्षेत्र वाढल्याने गाळप घेणाºया कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सोलापूरचे ३० कारखाने गाळप घेत आहेत, कोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू झाले आहेत. अहमदनगरचे साखर कारखाने सोलापूरपेक्षा अगोदर सुरू झाले आहेत.
जिल्ह्यात २८ कारखाने सुरू
च्कोल्हापूर विभागातील कोल्हापूरचे २१ व सांगलीच्या १३ कारखान्यांचे २४ लाख ९५ हजार ७७१ मे.टन गाळप झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १५, सातारा जिल्ह्यातील १३ व सोलापूर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांचे ४२ लाख ५९ हजार ९१५ मे.टन गाळप झाले आहे.