अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:48 PM2020-10-15T12:48:12+5:302020-10-15T12:52:01+5:30
तोडणी झालेल्या उसाचे नुकसान; पाऊस पडल्याचा फटका कारखान्यांना होणार
सोलापूर : गुरुवारपासून यावर्षीच्या गाळपाची सुरुवात करण्याची तयारी केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत. गाळप हंगाम लांबणीवर पडणार आहे. तोपर्यंत तोडणी झालेल्या उसाचे नुकसान होणार आहे.
यावर्षीच्या साखर हंगामाला गुरुवार दिनांक १५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने ऊस तोडणे, तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत आणणे कठीण झाले आहे. इंद्रेश्वर, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील, विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल कॉपोर्रेशन म्हैसगाव, पांडुरंग, जकराया व अन्य काही कारखान्यांची यंत्रणा सज्ज झाली आहे. या साखर कारखान्यांनी ऊसतोडणीही केली आहे. काही प्रमाणात कारखान्यांवर ऊस आणला आहे.
मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचा फटका कारखाना सुरू होण्याला बसला आहे. ऊसतोडणी यंत्रणा व तोडलेल्या उसाचे नुकसान कारखाना व शेतकºयांना सोसावे लागणार आहे. आता पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत, असे लोकनेते बाबुरावअण्णा पाटील कारखान्याचे संस्थापक राजन पाटील यांनी सांगितले.
--------
शेतकºयांचेच नुकसान..
मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने खरिपाच्या संपूर्ण उत्पादनावर शेतक?्यांना पाणी सोडावे लागले आहे. ऊस पिकातून तरी पैसे मिळण्याची एकमेव आशा आहे. पण मोठ्या पावसाने ऊस जमीनदोस्त झाला आहे, तर तोडलेला ऊस जागेवर व कारखाना स्थळावर राहणार असल्याने नुकसान शेतकºयांचेच होणार आहे.