उसाचे पाचट शेतातच कुजवावे : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:06+5:302020-12-07T04:16:06+5:30
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत आयोजित बाजीराव विहीर (वाखरी, ता. पंढरपूर) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत ...
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत आयोजित बाजीराव विहीर (वाखरी, ता. पंढरपूर) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी डी. एच. सरडे, कृषी सहायक के. एस. चव्हाण, टी. व्ही. देशमुख, एस. एम. रावण, अमरजीत जगताप, इब्राहिम मुजावर, जोतिराम पोरे, कृषीमित्र तात्या पोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. जमिनीची धूप टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दोन पिकांमध्ये अंतर हवे, माती परीक्षणानुसार खतांची मात्रा द्यावी. शेतात जैविक खतासह शेणखताचा अधिकाधिक वापर करावा. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन करणे महत्त्वाचे असल्याचे मंडल अधिकारी सरडे यांनी सांगितले.
शेतीला पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करावा. जमिनीचा पोत हा चांगला राहायला हवा. त्यासाठी प्रयत्न व्हावेत. यासाठी कंपोस्ट खत, जैविक खतांचा वापर करावा, असे सरडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन कृषी सहायक मोहन चौगुले यांनी केले.