उसाच्या तुऱ्यामुळे शेतकऱ्याची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:39+5:302020-12-12T04:37:39+5:30

दिवसेंदिवस उसाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. तालुक्यातील उसाचा विचार करता सदाशिवनगर व चांदापुरी या कारखान्याचे गाळप ...

Sugarcane stalks will disturb the farmers | उसाच्या तुऱ्यामुळे शेतकऱ्याची घालमेल

उसाच्या तुऱ्यामुळे शेतकऱ्याची घालमेल

Next

दिवसेंदिवस उसाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. तालुक्यातील उसाचा विचार करता सदाशिवनगर व चांदापुरी या कारखान्याचे गाळप बंद आहे. अतिरिक्त ऊस दराची कोंडी, वादळात ऊस अस्ताव्यस्त पडल्यामुळे भारनियमन, नादुरुस्ती, उंदीर, घुशी अशा अनेक गोष्टींचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. घाम गाळून जोपासलेले शेकडो एकर आडसाली ऊस सध्या शेतात उभे आहेत. यातील शेकडो एकर उसाच्या फडावर तुरे डोलताना दिसत आहेत.

तुरा आल्याने उत्पादनात घट

उसाची पूर्ण वाढ झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये उसाला तुरा येतो. उसाचे वाण, जमीन, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी व तण व्यवस्थापन आदी गोष्टीबरोबर हवामानाच्या प्रभावामुळे उसाला तुरा येतो. उसाला तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते. तुरा आल्यानंतर काही दिवसात उसाची तोडणी झाली नाही तर उसाला फुटवे फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होतो. त्यामुळे ऊस शेतात जास्त काळ राहिला तर उत्पादनात मोठी घट सहन करावी लागणार आहे.

फोटो

माळशिरस परिसरात उसाच्या फडांना आलेले तुरे.

Web Title: Sugarcane stalks will disturb the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.