दारूच्या नशेत बार्शीत मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:19+5:302021-05-09T04:23:19+5:30
बार्शी : तुळजापूर रोडवर बाजार समितीच्या गाळ्यासमोर पत्र्याच्या शेडमधे दारूच्या नशेत एका मजुराने अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बार्शी : तुळजापूर रोडवर बाजार समितीच्या गाळ्यासमोर पत्र्याच्या शेडमधे दारूच्या नशेत एका मजुराने अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
लहू गोपाळ रामगुडे (३५) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. शनिवारी सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. या घटनेनंतर लहूची बहीण अनसूया पिंटू दळवी (४१, रा. नाळे प्लॉट, बार्शी) हिने बार्शी पोलिसात खबर दिली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, लहू हा आडत बाजार समितीत मजूर म्हणून काम करीत होता. तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा. पत्नीच्या निधनानंतर तो बहीण अनसूयाकडे राहत होता. तो बाजार समितीत मोलमजुरी करायचा. दारूच्या नशेत त्याने बाजार समितीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस नाईक श्रीहरी घोडके करीत आहेत.