छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:36 AM2020-12-13T04:36:45+5:302020-12-13T04:36:45+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेळवे येथील स्वप्नाली गाजरे (वय १७) हिने घरात तिच्या अभ्यासाच्या खोलीत ६ डिसेंबरच्या संध्याकाळी ...

Suicide of a minor girl due to harassment | छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

googlenewsNext

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेळवे येथील स्वप्नाली गाजरे (वय १७) हिने घरात तिच्या अभ्यासाच्या खोलीत ६ डिसेंबरच्या संध्याकाळी ते ७ डिसेंबरच्या पहाटे आत्महत्या केली. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी तिचे वडील सत्यवान गाजरे यांनी तिची शाळेच्या वही तपासली. त्यात लाल पेनने लिहिलेले अर्धे पानाची चिठ्ठी मिळून आली.

त्या चिठ्ठीत स्वप्नालीने लहू परमेश्वर गाजरे, स्वप्नील कांतीलाल कौलगे व रमेश निवृत्ती गाजरे (सर्व रा.शेळवे, ता.पंढरपुर) यांनी छेडछाड केल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.

त्यामुळे वरील मुलांच्या त्रासामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद वडील सत्यवान प्रभु गाजरे यांनी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल केली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी वरील तीनही संशयीतांना ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले.

चिठ्ठीतील मजकुर

स्वप्नालीच्या बँगेत असलेल्या वहीत तिने किती सहन करु मी. मला आता अजिबात सहन होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशीबात नाही. कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर आणि स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा धुराळाच केलाय. आजपर्यंत या सर्वांचा त्रास मी सहन केला, पण पण आता सहन होत नाही म्हणून मी आज माझ जीवन संपवतेय. हे भारत माते मला माफ कर, आई बापू मला माफ करा आत्महत्या करणं गुन्हा आहे, तरीसुध्द मी करतेय तुमची स्वप्नाली असे चिट्टीतील मजकुर आहे.

Web Title: Suicide of a minor girl due to harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.