व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 08:49 IST2022-06-17T08:49:36+5:302022-06-17T08:49:53+5:30
पंढरपुरातील घटना

व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या
पंढरपूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील सावकाराने दिलेल्या मानसिक त्रासास कंटाळून लहू दिगांबर शिंगाडे (वय२८, रा. देशमुख मठामागे, भक्तीमार्ग पंढरपूर) तरुणाने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत या तरुणाच्या पत्नीने गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहू दिगांबर शिंगाडे यांनी संभाजी मरिबा काळे व आंबिका संभाजी काळे (दोघे रा. पंढरपूर) यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ते रुपये परतफेड करुन देखील आणखी ४० हजार रुपये व्याजाचे दे म्हणून सतत काळे यांनी लहू शिंगाडे यांना तगादा लावला. तसेच शिविगाळ, धमकी देवून लहू यांना त्रास दिल्याने व त्या त्रासापोटीच मानसिक तणावात लहू यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यामुळे लहू यांना आत्महत्या करण्यास, त्याचे मरणास संभाजी संभाजी काळे यांनीच प्रवृत्त केल्याची तक्रार मोनाली लहू शिंगाडे (वय २२, रा. भक्तीमार्ग, बाबासाहेब देशमुख मठामागे, पंढरपूर) यांनी दिली आहे. पुढील तपास सपोनि निलेश बागाव करीत आहेत.