कर्जाचा तगादा लावल्याने शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:01+5:302021-03-28T04:22:01+5:30
शैलेश पाटील (रा. भाळवणी) या शेतकऱ्याने २०१४ मध्ये रतनचंद शहा सहकारी बँकेकडून सहा लाख रुपये शेतीसाठी कर्ज घेतले ...
शैलेश पाटील (रा. भाळवणी) या शेतकऱ्याने २०१४ मध्ये रतनचंद शहा सहकारी बँकेकडून सहा लाख रुपये शेतीसाठी कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या हप्त्यापोटी २ लाख व त्यानंतर १ लाख असे एकूण ३ लाख रुपये तत्कालीन बँक सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांना दिले होते. सदर रक्कम नाझरकर यांनी त्यांच्या खात्यावर भरली नसल्याने पैशाचा वारंवार तगादा लावून त्रास दिला. वसुली अधिकारी बसवेश्वर सलगर (माळी) यांनी वारंवार घरी येऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून शैलेश पाटील यांनी १६ मार्च रोजीच्या पहाटे ५ वाजण्यापूर्वी विषारी औषधप्राशन केले. त्यांना अधिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना ते मयत झाले. याबाबत मयताचा भाऊ गंगासागर बसवेश्वर पाटील याने फिर्याद दिल्यानंतर वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहेत.