कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:17+5:302021-06-21T04:16:17+5:30

करमाळा : उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे एका महिला रुग्णाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत डॉ. राऊत यांनी पोलिसांना ...

Suicide of a woman receiving treatment at Corona | कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलेची आत्महत्या

कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलेची आत्महत्या

googlenewsNext

करमाळा : उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे एका महिला रुग्णाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत डॉ. राऊत यांनी पोलिसांना खबर दिली असून, त्यानुसार करमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मयत, अशी नोंद झाली आहे.

निर्मला अनिल गायकवाड (वय ५०, रा. जेऊर, ता. करमाळा), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, रविवारी पहाटे ३.३० वाजेदरम्यान हा प्रकार घडला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार जेऊर येथील महिला या मागील सात दिवसांपासून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होत्या. त्यांचा स्कोअर २२ पेक्षा अधिक होता. डॉक्टरांनी त्यांना बाहेर खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसताना झालेल्या असह्य वेदनांमुळे निर्मला यांनी पहाटे ३.३० वाजेदरम्यान कोविड वाॅर्डमध्ये खिडकीच्या लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास हवालदार संतोष देवकर करीत आहेत.

Web Title: Suicide of a woman receiving treatment at Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.