ऊसतोडीसाठी आलेल्या महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:25 AM2021-03-09T04:25:02+5:302021-03-09T04:25:02+5:30
भरत रामकिशन पव्हने व रदावनी भरत पव्हने हे पती-पत्नी ऊसतोड मजूर आहेत. ते दोन मुलांसह श्री पांडुरंग सहकारी ...
भरत रामकिशन पव्हने व रदावनी भरत पव्हने हे पती-पत्नी ऊसतोड मजूर आहेत. ते दोन मुलांसह श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (ता. माळशिरस) येथे ऊसतोडणी मजूर म्हणून काम करीत. कारखान्याच्या यार्डमध्ये झोपडी करून राहत होते. मयत रदावनी २५ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजण्याच्या सुमारास श्रीपूर येथील मेडिकलमधून गोळ्या घेऊन येते, असे सांगून निघून गेली. पुन्हा घरी आली नसल्याने ती बेपत्ता झाल्याची अकलूज पोलीस स्टेशनमध्ये २६ फेब्रुवारी रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली.
भरत पव्हने यांनी सर्व ठिकाणी शोधाशोध केली. गावाकडे निघून गेली असावी म्हणून तिचा शोध घेण्यासाठी मूळगावी गेले. दि. ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पोलिसांनी बोरगाव येथील खंडाळी रोडवरील आबा पाटील यांच्या शेतात बांधावरील झुडपामध्ये लहान झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फोनवरून त्यांना माहिती दिली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बाळासो पानसरे, धनाजी झगडे, किशोर गायकवाड, संजय चंदनशिवे, मकसूद सय्यद, संदेश रोकडे करीत आहेत.