अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकास सोलापूर जिल्हा परिषदेत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:09 PM2018-06-21T14:09:04+5:302018-06-21T14:09:04+5:30
शिक्षणाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांविरूध्द गुन्हा दाखल
सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये तक्रार अर्जाच्या चौकशी अहवालानुसार कार्यवाहीसंदर्भात व चौकशी करुन वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने भेटण्यासाठी गेलेल्या विनायक अशोक गायकवाड (वय ३८) यांना शिक्षणाधिकाºयासह झेडपीच्या सदस्याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंदली आहे. हा प्रकार १८ जून रोजी शिक्षणाधिकाºयाच्या चेंबरमध्ये घडल्याचे म्हटले आहे.
विनायक अशोक गायकवाड (वय ३८, रा. शहानगर सोसायटी, वांगी रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात १९ जून रोजी फिर्याद दिली. या प्रकरणी शिक्षणाधिकारी संजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने (रा. पंढरपूर), नकाते (रा. मंगळवेढा) या तिघांविरुद्ध भादंवि ३२४, १४१, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
१८ जून रोजी फिर्यादी हे त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी अहवालानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात व चौकशी करुन वरिष्ठ कार्यालयासह अहवाल सादर करण्यासंदर्भाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या कार्यालयात ते गेले असता, तिथे राठोडसह जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, नकाते व इतर तीन अशा सहा जणांनी संगनमत करून, त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर राठोड व माने या दोघांनी फिर्यादीच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कजागवाले करत आहेत.