सोलापूर जिल्ह्यात दोन शेतकºयांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:57 PM2019-03-11T12:57:47+5:302019-03-11T12:59:23+5:30
नरखेड/ रानमसले : नापीक शेती , दुष्काळ आणि बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेला कंटाळून राहत्या घरी गळफास ...
नरखेड/ रानमसले : नापीक शेती, दुष्काळ आणि बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील शेतकºयाने आत्महत्या केली तर अज्ञात कारणामुळे गोडसेवाडी (ता. बार्शी) येथील एकाने आत्महत्या केली.
मसलेचौधरी येथे बाळकृष्ण सिरसट यांची पाच-सहा एकर शेती आहे. शेतात बोअर घेतले होते. विहिरीचे पाणीही आटल्याने पिके वाळून गेली. शेत न पिकल्याने एचडीएफसी बँकेचे काढलेले कर्ज कसे फेडायचे, या मानसिक तणावाखाली ते होते. शनिवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वी राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ दत्तात्रय रामचंद्र सिरसट यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
गोडसेवाडी येथील मारुती निवृत्ती कदम याने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बालाजी बळीराम कदम यांनी फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.