सुळेवाडीचे रेशन दुकान निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:44+5:302021-04-25T04:21:44+5:30

विविध तक्रारीबाबत फेब्रुवारी महिन्यात ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबतची सर्व स्तरावर कारवाई पूर्ण होऊन अखेर दुकान निलंबन झाले. ...

Sulewadi ration shop suspended | सुळेवाडीचे रेशन दुकान निलंबित

सुळेवाडीचे रेशन दुकान निलंबित

Next

विविध तक्रारीबाबत फेब्रुवारी महिन्यात ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबतची सर्व स्तरावर कारवाई पूर्ण होऊन अखेर दुकान निलंबन झाले.

या रेशन दुकानाबाबत वारंवार तक्रारी पुढे येत होत्या. यात डिसेंबर, २०२० मधील धान्यसाठा परवानगीशिवाय इतर ठिकाणी ठेवणे, कार्डधारकास वेळेवर धान्य न देणे, धान्यसाठा रासायनिक खताच्या गोडाउनमध्ये ठेवणे, दुकानाबाबत वेळापत्रकाचा फलक न लावणे, मशीन बंद पडल्यामुळे लोकांना धान्य वितरित न करणे, धान्य वितरणाबाबत अनियमितता, अरेरावीची भाषा करणे, वारंवार दुकान बंद ठेवणे आदी तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी सदर दुकान निलंबित केले आहे.

Web Title: Sulewadi ration shop suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.