उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:58+5:302021-03-21T04:21:58+5:30

भीमानगर : उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास शनिवारी सुरुवात झाल्याची ...

Summer cycle starts from Ujani dam | उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनास सुरुवात

उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनास सुरुवात

Next

भीमानगर : उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास शनिवारी सुरुवात झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

२०२०च्या पावसाळ्यात १५ ऑक्टोबर रोजी उजनी धरणात १२३.२८ टीएमसी पाणीसाठा करण्यात आलेला होता. १९ जानेवारीपासून रब्बी हंगामातील नदी, कालवा, बोगदा व सिंचन योजनांचे एक आवर्तन झाले. २७ फेब्रुवारी रोजी हे आवर्तन बंद झाल्यानंतर धरणात ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. शनिवारी सकाळी १० वाजता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. सोलापूर महापालिका आयुक्ताकडून पाटबंधारे खात्यास मिळालेल्या पत्रानुसार, टाकळी बंधाऱ्यात २७ टीएमसी पाणी असून ते मार्चपर्यंत सोलापूर शहराला पुरेल एवढा साठा आहे.

---

३१ मार्चपर्यंत टाकळीत पाणी

त्याचप्रमाणे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, भीमा नदी काठावरील अनेक गावे, वाड्या वस्त्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने धरणाच्या दोन दरवाजांतून शनिवारी प्रथम एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी १६५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. २२ मार्चच्या सकाळपर्यंत धरणाच्या दहा ते बारा दरवाजांमधून सहा हजार क्युसेक पाणी नदी प्रवाह सोडण्यात येत आहे. हे पाणी भीमा नदीतील २४२ किलोमीटर अंतर पार करून व १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओलांडून २७ किंवा २८ मार्चपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल. नंतर ३० किंवा ३१ मार्चपर्यंत टाकळी व चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. ३१ मार्च रोजी नदीत पाणी सोडणे बंद करण्यात येणार आहे.

मुख्य कालवा शेवरे (माढा) येथे वीस किलोमीटरपर्यंत असून तेथून उजव्या कालव्यात १२१ किलोमीटरपर्यंत, तर डाव्या कालव्यात १२६ किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. उजव्या कालव्यावरून माळशिरस (पश्चिम भाग), पंढरपूर (पश्चिम- दक्षिण भाग), सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील एकूण २ लाख हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळते. डाव्या कालव्यातून माढा, पंढरपूर (उत्तर- पश्चिम भाग), मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोटपर्यंत एकूण ३ लाख हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे.

---

३४ हजार हेक्‍टर लाभ क्षेत्राला पाणीपुरवठा

सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना चालू आहे. सीना- माढासाठी दररोज २५९ क्युसेक व दहिगावसाठी १०५ क्युसेक पाणी वापरण्यात येत आहे. सीना -माढावरून माढा तालुक्यातील १२ हजार हेक्‍टर क्षेत्राला, तर दहिगावमधून २००० हेक्टरला पाणी मिळत आहे. बॅक वॉटरमधून माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा (अहमदनगर), दौंड, इंदापूर( पुणे) या तालुक्यातील एकूण ३४ हजार हेक्‍टर लाभ क्षेत्राला पाणीपुरवठा होतो आहे.

Web Title: Summer cycle starts from Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.