कासेगावच्या सरपंचपदी सुनंदा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:19+5:302021-03-06T04:21:19+5:30
कासेगाव : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासेगावच्या सरपंचपदी परिचारक गटाच्या सुनंदा सिदाजी भुसे यांची सरपंच ...
कासेगाव : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासेगावच्या सरपंचपदी परिचारक गटाच्या सुनंदा सिदाजी भुसे यांची सरपंच तर उपसरपंचपदी संग्रामसिंह वसंतराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच व उपसरपंच हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हरी गावधरे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सदस्य बाळासाहेब शेख, ॲडवोकेट संतोष देशमुख, सीताराम भुसे, ॲडवोकेट हंसराज देशमुख उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून कासेगावचे ग्रामविस्ताराधिकारी यलप्पले यांनी काम पाहिले.
---
जनतेने खूप विश्वासाने निवडून दिले आहे. गावच्या विकासाचा आराखडा आखला आहे. या आराखड्यानुसार पाच वर्षातील कामे करण्याचा प्रयत्न आहे. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करणार आहोत.
- संग्रामसिंह देशमुख
नूतन उपसरपंच कासेगाव
----
०५ कासेगाव
नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांसह विजय साजरा करताना जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख