सुनिल माने सोलापूर महावितरणचे नवे अधीक्षक अभियंता
By Appasaheb.patil | Updated: June 25, 2024 13:10 IST2024-06-25T13:10:35+5:302024-06-25T13:10:50+5:30
सुनिल माने हे लवकरच महावितरणच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार सोलापुरात घेणार आहेत.

सुनिल माने सोलापूर महावितरणचे नवे अधीक्षक अभियंता
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : ठाणे शहर विभागातील कार्यकारी अभियंता सुनिल महादेव माने यांची पदोन्नतीने महावितरणच्या सोलापूर मंडल येथे अधीक्षक अभियंतापदी निवड करण्यात आली आहे. याबाबत आदेशाचे पत्र मुख्य सरव्यवस्थापक सुचित्रा गुजर यांच्या सहीने सोमवारी रात्री उशिरा निघाले. सुनिल माने हे लवकरच महावितरणच्या अधीक्षक अभियंता पदाचा पदभार सोलापुरात घेणार आहेत.
राज्यातील ११ महावितरण अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. सुनिल माने हे मुळचे कोल्हापूर येथील असून त्यांनी यापूर्वी सोलापूरच्या महावितरण कार्यालयात काम केले आहे. लवकरच ते सोलापूरचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, माजी अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांची बदली झाल्यानंतर सोलापूर अधीक्षक अभियंता पदाचा पदभार सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीमुळे महावितरणमधील बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणूक संपल्यानंतर बदल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणखीन काही अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होणार असल्याची चर्चा महावितरण कार्यालयात सुरू आहे.