अंधश्रद्धेतून फासात अडकविला उदमांजर, वन्यजीव प्रेमींकडून सुटका; मुलांच्या हस्ते सोडले निसर्गाच्या सानिध्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:19 PM2023-08-08T15:19:40+5:302023-08-08T15:20:27+5:30

समाजात उदमांजराबाबत अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. त्यातून काही तामलवाडी येथील काही जणांनी त्याला दोरीचा फास करुन पकडले.

Superstitiously Trapped Udmanjar Rescued by Wildlife Enthusiasts; Left in the hands of children in the presence of nature | अंधश्रद्धेतून फासात अडकविला उदमांजर, वन्यजीव प्रेमींकडून सुटका; मुलांच्या हस्ते सोडले निसर्गाच्या सानिध्यात

अंधश्रद्धेतून फासात अडकविला उदमांजर, वन्यजीव प्रेमींकडून सुटका; मुलांच्या हस्ते सोडले निसर्गाच्या सानिध्यात

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : समाजात उदमांजराबाबत अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. त्यातून काही तामलवाडी येथील काही जणांनी त्याला दोरीचा फास करुन पकडले. याची माहीती मिळताचएनसीसीएसच्या (नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल असोसिएशन) सदस्यांनी उद मांजराची सुटका केली.

तामलवाडी येथील एका शाळेच्या शेजारी उद मांजर मुलांना दिसला. त्यांनी दोरीचा फास करत त्या उदमांजराला पकडले. यामुळे त्याला दुखापत झाली होती. याची माहीती वनसेवक राहुल पाटील यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वन्यजीव प्रेमींना दिली. काही वेळातच वन्यजीवप्रेमी तिथे दाखल झाले.

वन्यजीवप्रेमींनी उदमांजराला फासातून काढत कॅरी केजमध्ये (पिंजरा) ठेवले. अगोदर तिथल्या मुलांच्या व लोकांच्या मनातील भीती व गैरसमज हे माहिती देत दूर केले. त्यानंतर तो प्राणी तिथल्या जवळच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते पिंजरा उघडत सोडून देण्यात आले.

पाठलाग केल्याने उद मांजर घाबरले

उद मांजराला मुलांनी शाळेच्या मागील मैदानात पाहिले. त्यांनी आवाज करत उदमांजराचा पाठलाग केला. प्राणी घाबरुन एका बिल्डिंगवरील टाकीच्या मागे असलेल्या ठिकाणी बसले. प्राण्याबद्दल भीती, गैरसमज असल्यामुळे तिथल्या काही लोकांनी त्याला एका दोरीला फास बनवून काठीने अडकून ठेवले होते. वन्यजीवप्रेमींनी त्याची सुटका केली.

Web Title: Superstitiously Trapped Udmanjar Rescued by Wildlife Enthusiasts; Left in the hands of children in the presence of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.