रेमडेसिविरचा पुरवठा थेट रुग्णालयांना करा : केदार-सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:13+5:302021-04-20T04:23:13+5:30
कोरोनाबाधित रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे असल्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून नेमके किती इंजेक्शन देण्याची गरज आहे, याबाबत खात्री न ...
कोरोनाबाधित रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे असल्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून नेमके किती इंजेक्शन देण्याची गरज आहे, याबाबत खात्री न करता सरसकट ६ ते ७ इंजेक्शन आणावेत, अशी चिठ्ठी नातेवाईकांना दिली जात आहे; मात्र मेडिकल चालक इंजेक्शन उपलब्ध नाही, थांबावे लागेल, यापूर्वी नोंदणी केलेल्यांना इंजेक्शन द्यावे लागेल, अशी कारणे सांगून समोरच्या व्यक्तीला ताटकळत ठेवतात. शेवटी नाइलाजास्तव रुग्णांच्या नातेवाईकांना १२ ते १५ हजार रुपये देऊन इंजेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे.
कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी धावपळ होऊ नये, वेळेवर व मूळ किमतीत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन कोविड रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.