मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आंबेडकरवादी चळवळीतील तरुणही लोकसभा लढविणार!

By दिपक दुपारगुडे | Published: March 13, 2024 08:04 PM2024-03-13T20:04:31+5:302024-03-13T20:04:44+5:30

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देणे मुख्य उद्देश

Supporting the Maratha reservation, Ambedkarist youth will also contest the Lok Sabha | मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आंबेडकरवादी चळवळीतील तरुणही लोकसभा लढविणार!

मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आंबेडकरवादी चळवळीतील तरुणही लोकसभा लढविणार!

दीपक दुपारगुडे, सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देत करमाळा तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील तरुण युवकांनी लोकसभेला उमेदवारी भरणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये भीम दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, आंबेडकरवादी चळवळीचे अजय नवनाथ कांबळे, सिद्धनाथ सदाशिव वाघमारे या संदर्भात संबंधित उमेदवारांनी करमाळा तालुका सकल मराठा समाज समन्वयक सचिन काळे यांच्याशी संपर्क साधला. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण घेतलेल्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सचिन काळे यांना आंबेडकरवादी चळवळीतील युवकांनी सांगितले आहे.

यावेळी करमाळा तालुका समन्वयक सुनील सावंत, सचिन घोलप, विजय लावंड, अतुल फंड, बापू घोलप, विनय ननवरे, सचिन गायकवाड, महादेव फंड, प्रवीण जाधव, अमोल यादव, प्रताप जगताप, ज्योतीराम ढाणे, गणेश कुकडे, अरुण जगताप, संतोष वारे, अमोल लावंड आदींनी स्वागत केले.

करमाळा शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील पाच युवकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार असल्याचे पुरुषोत्तम बरडे, राजनभाऊ जाधव, माऊली पवार, रवी मोहिते, किरण घाडगे, दीपक वाडदेकर, दत्ता मुळे यांना कळविले आहे. या तरुणांचा सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सन्मान करून सामाजिक सौहार्द कायम टिकून राहावे यासाठी करमाळा शहरातही जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती करमाळा तालुका सकल मराठा समाज समन्वयक सचिन काळे यांनी दिली.

Web Title: Supporting the Maratha reservation, Ambedkarist youth will also contest the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.