शरद पवार यांच्या पावसातील सभेच्या देखाव्याची सुप्रियाताईंनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 09:17 PM2021-11-01T21:17:53+5:302021-11-01T21:18:39+5:30

सौरभ भांड व आर.बी.फ्रेंडसचा देखावा

Supriyatai took note of the scene of Sharad Pawar's meeting in the rain | शरद पवार यांच्या पावसातील सभेच्या देखाव्याची सुप्रियाताईंनी घेतली दखल

शरद पवार यांच्या पावसातील सभेच्या देखाव्याची सुप्रियाताईंनी घेतली दखल

googlenewsNext

सोलापूर  - सोलापूर येथील होटगी रोडवरील भारतमाता सोसायटीतील सौरभ भांड आणि RB FRIENDS CIRCLE यांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सवात तयार केलेल्या सातारा येथील पावसातील सभेच्या  देखाव्याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्याची माहिती सौरभ भांड यांनी दिली.

शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी सौरभ भांड व त्यांच्या मित्रांनीृ  यदाच्या गणेशोत्सवात,  राज्याच्या दोन वर्षापुर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारार्थ सातारा येथील शरद पवार यांच्या सभेचा देखावा तयार केला होता. सोशल मिडीयावर हा देखावा व्हायरल झाल्यानंतर राष्टृवादीच्या सोलापुरातील अनेक नेत्यांनी भांड यांच्या घरी जाऊन हा देखावा पाहीला होता.  नुकत्याच सोलापुर दौर्‍यावर आलल्यानंतर स्वत: शरद पवार यांनी या देखाव्याचे कौतुक करुन बारामती निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले.

ऐंशीच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले आजारा पाठीवर घेऊन फिरणाऱ्या एका योध्दयाची प्रेरणा आजच्या युवकांना मिळावी, यशाचे सर्व दरवाजे बंद असताना ही नाउमेद न होता ही जिद्दीने उभे राहिले तर यश प्राप्त होते हा संदेश देणाऱ्या या देखाव्याची दखल संसदपटू खा सुप्रिया सुळे यांनी घेतली आणि आपल्या व्यस्त राजकारणातून खास वेळ काढून आम्हा युवकांच्या कामाचं कौतुक केले. दिशादर्शक युवकांची आजच्या समाजाला नितांत गरज आहे मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अशा शब्दांत मातृह्रदयी पाठबळ दिले. खा सुप्रिया सुळे यांचे आम्ही ऋणी आहोत असे मत सौरभ भांड यांनी व्यक्त केले.

पुणे येथे झालेल्या भेटीत सुप्रिया सुळे यांच्या सोबत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपस्थित होते. तसेच सौरभ भांड यांचे सहकारी रोहित बिराजदार, रिषभ भांड, गुंडू बोंडगे, महेश सालोटगी, विशाल शिवपुरे, अथर्व पाठक उपस्थित होते. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी स्वतः सौरभ भांड यांना भेटीचे निमंत्रण दिले होते.

Web Title: Supriyatai took note of the scene of Sharad Pawar's meeting in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.