सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर सोलापूर जिल्ह्यातील ५९ गावांमधून जाणार; जाणून घ्या गावांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 04:09 PM2022-04-08T16:09:36+5:302022-04-08T16:10:31+5:30
गॅझेट प्रसिद्ध : बार्शी, दक्षिण तसेच अक्कलकोटमधील ५१ गावांचा समावेश, उत्तरमधील फक्त ८ गावे
सोलापूर : जिल्ह्यासाठी बहुउपयोगी ठरणाऱ्या सूरत चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्स्प्रेस ज्या गावातून जाणार आहे, त्या ५९ गावांची नावे गुरुवारी द गॅझेट ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहेत. उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, भूसंपादन प्रक्रिया लवकरच ५९ गावांतून सुरू होईल, अशी माहिती देखील गॅझेटद्वारे देण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील १८, उत्तर सोलापूर तालुक्यातील ८, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १६, तसेच अक्कलकोट तालुक्यातील १७ गावांमधून कॉरिडॉर जाणार आहे. ५९ गावांमधून १५३ कि.मी.चे भूसंपादन होणार असून, हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.
सूरत चेन्नई कॉरिडॉरबाबत खूप उत्सुकता लागून राहिली होती. कोणत्या गावातून कॉरिडॉर जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर ही उत्सुकता संपली असून, आता कोणाच्या शेतातून किंवा गटातून काॅरिडॉर जाईल, जोरात चर्चा सुरू आहे. याबाबत डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात डीपीआर बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दिली आहे.
बार्शी तालुक्यातील
परांडा तालुक्यातील हिंगणगाव येथून हा महामार्ग बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथून प्रवेश करतो. नागोबाचीवाडी येथून पुढे लक्ष्याचीवाडी, उपळाई, अलीपूर, कासारवाडी, बळेवाडी, दडशिंगे, कव्हे, पानगाव, उंडेगाव, काळेगाव, मानेगाव, वैराग, सासुरे, सर्जापूर, हिंगणी, रातंजन, चिंचखोपण
.....................................
उत्तर सोलापूरमधील गावे
मार्डी, तरटगाव, बाणेगाव, कारंबा, गुळवंची, खेड, शिवाजी नगर, तसेच केगाव
.....................
दक्षिण सोलापूरमधील गावे
उळे, कासेगाव, बोरामणी, तांदूळवाडी, संगदरी, मुस्ती, दर्गनहळ्ळी, धोत्री, तीर्थ, कुंभारी, यत्नाळ, फताटेवाडी, होटगी, हत्तूर, घोडातांडा, मद्रे
...............
अक्कलकोटमधील गावे
चप्पळगाववाडी, दहिटणेवाडी, कोन्हाळी, चप्पळगाव, बोरोगाव, डोंबरजवळगे, बऱ्हाणपूर, अक्कलकोट, नागणहळ्ळी, उमरगे, मिरजगी, मैंदर्गी, नागोरे, मुगळी, संगोगी, तसेच दुधनी
.....................