आमच्या पोटावर पाय देऊन होतोय सुरत-चेन्नई महामार्ग; गडकरींना शेतकऱ्यांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:45 PM2023-02-21T19:45:25+5:302023-02-21T19:46:17+5:30

आम्हाला वाचवा : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना शेतकऱ्यांनी थेटे केले ट्विट

Surat-Chennai highway is running on our stomach; Farmers of solapur need attention of Nitin Gadkari on Tweet | आमच्या पोटावर पाय देऊन होतोय सुरत-चेन्नई महामार्ग; गडकरींना शेतकऱ्यांचे ट्विट

आमच्या पोटावर पाय देऊन होतोय सुरत-चेन्नई महामार्ग; गडकरींना शेतकऱ्यांचे ट्विट

googlenewsNext

संताजी शिंदे

सोलापूर : आमच्या पोटावर पाय देऊन सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग होत आहे. आम्हाला वाचवा, अशी पोस्ट ट्विटरवरून जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना केले आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर महामार्गाअंतर्गत गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला अत्यल्प मिळत असल्याने, शेतकरी संतप्त झाले आहेत.

गुजरातमधील सुरतहून थेट चेन्नईला जोडणारा ग्रीनफिल्ड महामार्ग सोलापुरातूनही जात आहे. अहमदनगरच्या सीमेवरून सोलापुरातील बार्शी तालुक्यातील १५, दक्षिण सोलापूर तालुक्यात ४, तर अक्कलकोट तालुक्यातील १६ अशा ३५ गावांतून १५० कि.मी. महामार्ग जात आहे. संपादित होणाऱ्या सर्व जागेची मोजणी पूर्ण झाली आहे, आता संबंधित मालकांना नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून पैसे दिले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने रेडी रेकनरनुसार संबंधित जमिनींचा दर निश्चित करून, तशा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे.

प्राप्त झालेल्या नोटिसीमध्ये जिरायतीसाठी साधारणत: एकरी ४ ते ५ लाख रुपये, तर बागायतीक्षेत्रासाठी अवघे ५ ते ७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ग्रीनफील्डच्या संपादन प्रक्रियेत गेल्या आठवड्यापासून नुकसानभरपाई संदर्भात नोटिसा जारी करण्यात येत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला दर पाहून शेतकरी संतप्त होत आहेत. प्रत्येक तालुक्यात ग्रीनफिल्ड संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. शेतकरी थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या ट्विटरवर आपल्या भावना पोस्ट करीत आहेत.

शेतकऱ्यांचे आयुष्य बरबाद होत आहे
० अक्कलकोट तालुक्यातील ग्रीनफिल्ड संघर्ष समिती चपळगावचे शेतकरी शंभूलिंग अकतनाळ यांनीही ट्विटरवर थेट पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी साहेब, नमस्कार आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त आहात. अन् याच समर्थांच्या भूमितील भूमिपुत्रांवर अन्याय झालाय. बाधित शेतीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृपया प्रश्न मार्गी लावावे अशी भावना व्यक्त केली आहे.

Web Title: Surat-Chennai highway is running on our stomach; Farmers of solapur need attention of Nitin Gadkari on Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.