फलटण-पंढरपूर रेल्वेचे सर्वेक्षण जुन्या मार्गानेच करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:37+5:302021-03-05T04:22:37+5:30
पंढरपूर : फलटण-पंढरपूर रेल्वेबाबत नवीन रेल्वेच्या सर्वेक्षणामध्ये अनेक गावांतील नागरिकांच्या जमिनी, घरे जात आहेत, हे व्यावसायिक दृष्ट्याही योग्य नाही. ...
पंढरपूर : फलटण-पंढरपूर रेल्वेबाबत नवीन रेल्वेच्या सर्वेक्षणामध्ये अनेक गावांतील नागरिकांच्या जमिनी, घरे जात आहेत, हे व्यावसायिक दृष्ट्याही योग्य नाही. त्यामुळे संपूर्ण अहवाल हा निर्धारित म्हणजेच जुन्या सर्वेक्षणानुसार करावा, अशी सूचना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
फलटण-पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाबाबत खासदार नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये पुणे येथे आढावा बैठक झाली. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक सारेश भाजपे, विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, श्याम कुलकर्णी, नजीब मुल्ला, श्रीनिवास उपस्थित होते.
याप्रसंगी फलटण-बारामती रेल्वेमार्गाचाही आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांच्या जमिनी हस्तांतरण व मोबदला याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यात प्रस्तावित केलेला हैदराबाद-मुंबई बुलेट ट्रेन मार्ग याच्यावरही चर्चा झाली. माढा तालुक्यातील रेल्वेच्या थांब्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव कांबळे यांनी सुचविलेल्या कामाबद्दल चर्चा केली.